

उचगावात नवरात्रीनिमित्त
विविध कार्यक्रमांचे आयोजन
उचगाव ः ग्रामदैवत श्री मंगेश्वर देवाच्या नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगेश्वर नवरात्र उत्सव समितीतर्फे शुक्रवार (ता. ४) पासून विविध कार्यक्रम होतील. शुक्रवारी बाल संगीत भजनी मंडळ, शनिवारी (ता. ५) कीर्तनकार सत्यजित निकाळे महाराज कुरली यांचे कीर्तन होईल. रविवारी (ता. ६) श्री ब्रह्मनाथ सोंगी भजनी मंडळ, उचगाव यांचे सोंगी भजन होईल. सोमवारी (ता. ७) कृष्ण विहार महिला भजनी मंडळ, टेंबलाईवाडी उंचगाव यांचे भजन आहे. मंगळवारी (ता. ८) महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. बुधवारी (ता. ९) कीर्तनकार राहुल महाराज पारठे यांचे कीर्तन होईल. गुरुवारी (ता. १०) सर्जेराव पाटील देवमामा रेणुका जागर पार्टी यांचा रेणुका जागराचा कार्यक्रम आहे. शुक्रवारी (ता. ११)रायझिंग स्टार प्रस्तुत अंध कलाकारांचा गाणी आमची नजर तुमची हा कलाविष्कार सादर होईल. कार्यक्रमास उपस्थित राहावे; असे आवाहन मंगेश्वर नवरात्र उत्सव कमिटीतर्फे केले आहे. कार्यक्रम रात्री साडेनऊला मंगेश्वर देवालय चौकात होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.