उचगाव सेवा मार्गावर सांडपाण्याचा प्रश्न सुटला वाहनधारकांच्यात समाधान मोठा नळ घालून प्रश्न सोडवला

उचगाव सेवा मार्गावर सांडपाण्याचा प्रश्न सुटला  वाहनधारकांच्यात समाधान  मोठा नळ घालून प्रश्न सोडवला
Published on

उचगाव सेवा मार्गावर बसविला नळा
सांडपाण्याचा प्रश्न सुटला; वाहनधारकांत समाधान

सकाळ वृत्तसेवा

उचगाव, ता. ६ ः येथील हायवे चौकाच्या पूर्व बाजूस सेवा मार्गावर सांडपाणी आल्याने पाण्याची तळे बनले होते. मात्र, दोन दिवसांपासूनन रस्ते विकास महामंडळाने युद्धपातळीवर काम करून सेवा मार्गावर मोठा नळा बसविला आहे. त्याद्वारे सांडपाण्याचा निचरा होणार असल्याने वाहनधारकांत समाधान पसरले आहे. याबाबत यासंदर्भात दै. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते.
उचगाव हायवे चौक परिसरामध्ये दोन्ही बाजूला सेवामार्ग आहेत. पूर्व बाजूच्या सेवा मार्गावर लगत उचगाव कमानीकडून येणाऱ्या सांडपाण्यासाठीची गटर आहे. हायवेच्या पूर्वेकडील बाजूला असणाऱ्या सेवा मार्गाखालील नाला तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. तसेच दुर्गंधी पसरलेली होती. साचलेल्या सांडपाण्यामुळे वाहनधारकांना तिथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे नाक मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत होता. उचगाव हायवे चौकात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे अनेक वाहने अर्धा तास एका जागेला उभे असतातभारतीय राजमार्ग प्राधिकरणाने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत होती. याबाबत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. आठवडाभर सांडपाणी साचूनही संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. येथील सांडपाण्याचा बंदोबस्त करावा; अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत होती.

कोट
या मार्गावरून नेहमीच प्रवास करतो. महिन्यापासून येथे सांडपाण्याचे तळे साचले आहे. हायवे चौकात वाहतूक कोंडी होतेच. त्यामुळे थांबले की दुर्गंधीचा त्रास वाहनधारकांना होत होता. वेळाने का होईना रस्ते विकास महामंडळाला जाग आली.
- अजित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते उचगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com