गडमुडशिंगीमध्ये धुळसिद्ध बिरदेव देवस्थान नूतन सभामंडप पायाभरणी

गडमुडशिंगीमध्ये धुळसिद्ध बिरदेव देवस्थान  नूतन सभामंडप पायाभरणी
Published on

04175

धूळसिद्ध बिरदेव मंदिराच्या
सभामंडपाची पायाभरणी

उजळाईवाडी, ता. ६ ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र धूळसिद्ध बिरदेव देवस्थान येथे नूतन सभामंडपाच्या पायाभरणी पूजन सोहळा झाला. सभामंडपासाठी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे १.५ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधीच्या कामाचा प्रारंभ झाला.
सभामंडप उभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी श्रद्धास्थान ठरणार आहे. यापूर्वी, १८ ऑक्टोबरला मंदिराच्या बांधकामाचे उद्घाटन अमल महाडिक यांच्या हस्ते झाले होते. जुन्या सभा मंडपाच्या निर्लेखानानंतर नूतन सभा मंडपाच्या कामाची पायाभरणी झाली. पायाभरणी पूजनप्रसंगी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि उपसरपंच तानाजी पाटील, अशोक वाघुडे, रामचंद्र शिरगावे, तसेच गणपती पुजारी, महादेव पुजारी, लक्ष्मण पुजारी, म्हाळू पुजारी, यशवंत खिल्लारी, धुळा पुजारी, महाळू बनकर, मधुकर माने, कृष्णात रेवडे यांसह धनगर समाजातील आबालवृद्ध, महिला, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. सभामंडपाच्या बांधकामामुळे भाविकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com