

तामगावला जलजीवन कामात अनियमितता
उजळाईवाडी, ता. १६ : तामगाव (ता. करवीर) येथे सुरू असलेल्या तसेच काही प्रमाणात पूर्ण झालेल्या जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा कामांमध्ये गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि भूसांकेताप्रमाणे चुकीची पाइपलाइन बसविली आहे, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) करवीर तालुका आयटी सेल व सोशल मीडिया अध्यक्ष विक्रम उत्तम ढाले यांनी केला.
ढाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण गावात सर्व्हे झालेल्या काही भागांतच पाइपलाइन टाकण्यात आली असून, सर्व्हे न झालेल्या क्षेत्रांतही पाइपलाइन घालण्यात आली आहे. यामुळे अनेक कुटुंबांपर्यंत अद्याप पाणी पोचलेले नाही, तर बिल मात्र भरमसाट स्वरूपात येत आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून सरकारी निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास समस्त तामगाव ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ढाले यांनी पत्रात दिला आहे. ग्रामस्थांच्या मते, पाइपलाइनचे अपूर्ण काम आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे आरोग्याशीही खेळ केला जात आहे. जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या खर्चाचा लेखाजोखा व गुणवत्तापरीक्षणाची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून होण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.