

jaysingpur blood donation
esakal
वरद विनायक सांस्कृतिक विरंगुळा केंद्र शाहूनगर जयसिंगपूर या संस्थेचा १० वा वर्धापन दिन आणि श्रीमती प्रेमला भा. मुरगुंडे (आऊ) माजी नगरसेविका यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मा. आरोग्य मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरसो व जयसिंगपूर नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष मा. श्री. संजय पाटील यड्रावकर तसेच उपनगराध्यक्ष मा. सौ. अनुराधा आडके यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीराच्या निमित्ताने जयसिंगपूर नगरीतील सेवाभावी शिक्षिका व एक आदर्श समाजसेविका श्रीमती मुरगुंडे आऊ यांच्या वाढदिवसानिमित्त विरंगुळा केंद्राच्या महिला कार्यकारिणी मार्फत आऊंना गौरविण्यात आले. ग्रुपच्या अध्यक्षा सौ. महादेवी म. बिरजदार व उपाध्यक्षा श्रीमती शैलजा अजित निटवे यांनी साडी, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन आऊंचा सत्कार केला.
rajendra yadravkar
श्रीमती मुरगुंडे आऊ यांच्या कार्यामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श आपल्यासमोर सदैव असावा या हेतूने आऊंना मा. राजेंद्र यड्रावकरसो तसेच मा. संजय यड्रावकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, "आऊंचे सामाजिक कार्य हे प्रचंड मोठे असून त्यांनी यापुढेही समाजसेवेचे आपले व्रत अविरत चालू ठेवावे आणि आऊंना शतायुष्य लाभावे."
या प्रसंगी महिला कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनीही आऊंना शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केला. त्यांचे विरंगुळा केंद्रामार्फत आभार मानण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.