Thur, March 23, 2023

पुतण्याने आवळला चुलत्याचा गळा.
पुतण्याने आवळला चुलत्याचा गळा.
Published on : 17 March 2023, 5:20 am
पुतण्याकडून चुलत्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न
उत्तूर ः महागोंड (ता. आजरा) येथे नामदेव कोंडीबा देसाई (वय ६०) यांचा त्यांचे पुतणे विजय प्रकाश देसाई यांनी गळा आवळ्याचा प्रयत्न केला. याबाबत नामदेव देसाई यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. दोघांमध्ये शेताच्या हद्दीवरून बऱ्याच दिवसापासून वाद आहे. गट नंबर २४२ मधील शेतात नामदेव देसाई ऊसाची लावन करीत होते. या वेळी विजयने तू माझ्या जागेत रोप का लावतोस म्हणून भांडण काढले. व नामदेवच्या गळ्यात असलेला काळा गोफ ओढून गळा आवळ्याचा प्रयत्न केला व मारहाण केली.