चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू
चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

sakal_logo
By

03713
...

चव्हाणवाडी येथील वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू

आजरा ः तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पांडुरंग बाळू यादव (वय ७७) यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. याबाबत सयाजी पांडुरंग यादव यांनी पोलिसांत वर्दी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, यादव यांची गट नंबर ३६५ मध्ये जमीन आहे .या शेतात विहीर आहे. या ठिकाणी त्यांनी जनावरे पाळली आहेत. पांडुरंग यादव हे रविवारी (ता.२८) दुपारी तीन वाजता जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीत उतरले. यावेळी तोल जाऊन ते पाण्यात पडले. तासाभराने त्यांची सून शेताकडे आल्यावर त्यांना सासरे दिसले नाहीत. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांची टोपी तरंगताना तर चप्पल काठावर दिसले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांना कळविली. मुलगा सयाजी यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता वडील पांडुरंग यांचा मृतदेह आढळला. अधिक तपास हवालदार निरंजन जाधव करत आहेत.