जलसमाधी आंदोलनावर धरणग्रस्त ठाम :आंबेओहोळ धरणग्रस्तांची

जलसमाधी आंदोलनावर धरणग्रस्त ठाम :आंबेओहोळ धरणग्रस्तांची

Published on

जलसमाधी आंदोलनावर
आंबेओहोळ धरणग्रस्त ठाम
उत्तूर : आंबेओहळ धरणस्थळावर १० जुलै रोजी जलसमाधी आंदोलन होणार आहे. या आंदोलनाबाबत चर्चा व निर्णय वरिष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचे आंबेओहळ अन्यायग्रस्‍त, धरणग्रस्त संघटनेचे नेते संजय येजरे यांनी सांगितले. गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयात अधिकारी व धरणग्रस्त संघटनेची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी मल्लीकार्जुन माने यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न अजून शिल्लक असून, याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणी धरणग्रस्त संघटनेने केली होती. यावेळी कॉ. शिवाजी गुरव, बाबूराव नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.