कचरा व्यवस्थापनासाठी तीन घंटागाड्या घेणार

कचरा व्यवस्थापनासाठी तीन घंटागाड्या घेणार
Published on

लोगो ः आजरा नगरपंचायत सभा
....................
कचरा व्यवस्थापनासाठी तीन घंटागाड्या घेणार

गाळे भाडेवाढ, पाणीपुरवठा वाढ, सौर दिवे दुरुस्तीसह विविध समस्यांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ ः आजऱ्यात कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा, या उद्देशाने आणखी तीन घंटा गाड्या खरेदी करण्याचा ठराव आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक चराटी होते.
विषयांचे वाचन निहाल नायकवडी यांनी केले. नगरपंचायतीच्या गाळे भाडेवाढीवरून पुन्हा चर्चा झाली. दुकानदारांनी भाडेवाढ करू नये, असा अर्ज दिला आहे. यावर चर्चा होऊन समिती स्थापन करून दुकानदारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. उत्पन्नात वाढ होण्यासाठी भाडेवाढ करावी, अशी सूचना डॉ. इंद्रजित देसाई व अनिकेत चराटी यांनी केली. दुकानदारांकडून अनामत व भाडे घेण्याची सूचना परशुराम बामणे यांनी केली.
शहर समन्वयक प्रश्नावरून नगरसेवक परेश पोतदार यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नफा फंडातून आम्हाला पगार देणे परवडत नसल्याचे सांगून दोन महिला काम करत असताना एका महिलेला पगार दिला जातो, यावर त्यांनी नापसंती व्यक्त केली. शहरात ११ विजेचे खांब आहेत, ज्यांच्यामुळे अडथळा येत असल्याचे नगराध्यक्ष चराटी यांनी सांगितले. पत्रव्यवहार करूनही कार्यवाही झालेली नाही.
नाईक गल्लीत सौरदिवे बसविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. शहरात बसविलेले काही सौरदिवे नादुरुस्त आहेत. पाच वर्षे देखरेख असताना दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे ठेकेदाराने मागणी केलेली अनामत रक्कम देऊ नये. मागेल त्याला पाणी कनेक्शन दिल आहे. याचा सर्व्हे करावा, अशी सूचना पोतदार यांनी केली.
जुने तहसील कार्यालय व पोलिस ठाण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या इमारतीचा हेरिटेजमध्ये समावेश असल्याने मंजुरी मिळाल्यास केवळ आतील सुशोभीकरण करावे लागेल, असे चराटी यांनी सांगितले. लेंड ओहळचा उपसा करून पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावे, अशी सूचना असिफ पटेल यांनी केली. आजरा डेपोपासून ते हॉटेल विनोदपर्यंत लक्झरी व ट्रक लावले जातात. समोरून येणारे वाहन दिसत नाही. हायवे असल्याने वाहने सुसाट असतात. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांना सांगून येथे नो पार्किंग करावे, अशा सूचना असिफ सोनेखान यांनी दिल्या. गांधीनगर येथील प्राथमिक शाळेची दुरवस्था झाल्याचे नगरसेविका आसावरी खेडेकर यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या रहिवाशांना ३५ मिनिटे पाणी मिळते, ते वाढवून ४५ मिनिटे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चर्चेत नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, निशात चाँद, निसार लाडजी, विक्रांत पटेकर, रेश्मा बुड्डेखान यांनीही सहभाग घेतला. सभेस उपनगराध्यक्षांसह नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com