वडणगेत ऊस पाचट स्पर्धेची सोडत व सत्कार समारंभ संपन्न

वडणगेत ऊस पाचट स्पर्धेची सोडत व सत्कार समारंभ संपन्न

Published on

02117
ऊस पाचट स्पर्धेत
संजीवनी शेलार प्रथम
वडणगे, ता, ४ : कृषी विभागांतर्गत २०२३-२४ करिता ऊस पाचट स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील कृषी सहाय्यक तानाजी केरबा पाटील यांचे संकल्पनेतून ही स्पर्धा राबविली होती. स्पर्धेची सोडत वडणगे सोसायटी कार्यालयात नुकतीच झाली.
ऊस पाचट स्पर्धेचे विजेते प्रथम - संजीवनी संजय शेलार, द्वितीय-सर्जेराव शामराव देवणे, तृतीय-रोहित भगवान तेलवेकर व उत्तेजनार्थ विश्वराज अभिजीत पाटील आणि विजय बाळकृष्ण काटकर, आंबेवाडी यांना देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी अरुण भिंगारदेवे व कृषी सहाय्यक टी. के. पाटील यांची राधानगरी कृषी चिकित्सालयात कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नतीबद्दल सरपंच संगीता शहाजी पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार यांची नागपूरला बीज परीक्षण अधिकारी (वर्ग १) पदावर पदोन्नतीबद्दल व मंडल कृषी अधिकारी संतोष पाटील यांचा सत्कार वडणगे सेवा सोसायटी सभापती उत्तम शामराव देवणे यांच्याहस्ते झाला. ऊस पाचट स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख रकमेचे पारितोषिक टी. के. पाटील यांच्या सौजन्याने तर उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक विघ्नेश कृषी सेवा केंद्राचे अमर कांबळे यांनी दिले.शेतकरी प्रतिनिधी पिराजी संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक सुनील पंडित यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वडणगे सेवा संस्थेचे संचालक, कर्मचारी व सभासद, विघ्नेश कृषी सेवा केंद्राचे अमर कांबळे, स्पर्श अँग्रो सर्विसेसचे पंकज मिरजे यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी उपसरपंच सविता लांडगे, संचालक मंडळ, कृषी अधिकारी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com