तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिक्षक कार्यशाळा उत्साहात
04257
कोरे कॉलेज ऑफ फार्मसीत
राज्यस्तरीय शिक्षक कार्यशाळा
वारणानगर, ता. १७ : एनबीए ॲक्रिडीटेशन मिळविण्याकरिता लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांसह प्रत्येक घटकांचा समावेश असणे गरजेचे असते, असे मत वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जीनी यांनी येथे केले.
येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) येथे ‘एनबीए ॲक्रिडीटेशन फ्रेमवर्क अँड गाईडलाईन्स’ विषयावर राज्यस्तरीय दोनदिवसीय शिक्षक कार्यशाळा झाली. यावेळी श्री. कार्जीनी यांनी ‘एनबीए इव्हाल्युएअशन गाईडलाईन्स’ विषयावर मार्गदर्शन केले.
डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. सी. एम. जमखंडी यांनी स्वागत करुन कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला.वाळवा येथील डॉ. नागनाथअण्णा नायकवडी कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांचे ‘इफेक्टिव्ह इम्पलेमेंटेशन ऑफ ओबीई रोडमॅप फॉर एनबीए ॲक्रिडीटेशन फॉर डिप्लोमा फार्मसी’ बेळगांव येथील फार्माकोग्नोसी, केएलई कॉलेज ऑफ फार्मसच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना पाटील ‘इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन : व्हिजन, मिशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग’, कोल्हापूर येथील केआयटी कॉलेजच्या विभागप्रमुख पल्लवी पाटील यांचे ‘डॉक्युमेंटेशन गाईडलाईन्स फॉर एन बी ए ॲक्रिडीटेशन’ विषयावर विवेचन केले. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, डिग्रीचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांचे मार्गदर्शन लाभले.’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. नुपूर कुलकर्णी, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. एस्थेर गायकवाड, प्रा. अपर्णा आचार्य, प्रा. योगेश चंदनशिवे, विकास पाटील, कृष्णात पायमल, संताजी पाटील, पंडित नलवडे, अशोक कुंभार, प्रवीण भोसले यांनी परिश्रम घेतले. प्रा. वृंदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.