वारणानगरला आजपासून सुब्रतो फुटबॉल स्पर्धा

वारणानगरला आजपासून सुब्रतो फुटबॉल स्पर्धा

Published on

वारणेत आजपासून
सुब्रतो फुटबॉल स्पर्धा
वारणानगर : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा १२ ते १५ जुलै दरम्यान येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी ॲकॅडमीच्या (सैनिक स्कूल) क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती प्राचार्य टी. बी. ऱ्हाटवळ यांनी दिली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने या स्पर्धाचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन प्रा. डॉ. शोभा कुंभार, जिल्हा क्रीडाधिकारी अरुण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील फुटबॉल संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.