टू ६

टू ६
Published on

04837
कोरे कॉलेज ऑफ फार्मसीत
टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा
वारणानगर, ता. ३० : येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) येथे आंतरराष्ट्रीय औषध निर्माता दिन तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या हीरक महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईपुरस्कृत राज्यस्तरीय टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली.
स्पर्धेत राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पुणे विभागातील संस्थांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत विविध संस्थातील ६० विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन केले. डॉ. छाननीसाठी रवींद्र हिरेमठ, डॉ. राजकुमार बगली, डॉ सचिन निटवे, डॉ. सुजित देसाई यांनी काम पहिले. परीक्षक म्हणून डॉ. संगण्णा बुर्ली, डॉ. विद्याराणी खोत, संदीप जगताप, अक्षय कटगेरी यांनी काम केले. इचलकरंजीतील मेडी सर्व्ह सर्जिकल अँड हॉस्पिटल इक्विपमेंटचे भास्कर सूर्यापेठ, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. राजकुमार बगली उपस्थित होते. स्पर्धेत ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी मते सादर केली.
स्पर्धेचा निकाल असा ः रिझा अन्सारी, अफशा खान (एमसीई सोसायटीज इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, आझम कॅम्पस, पुणे) सानिया जमखंडी, तनुजा नार्वेकर (शरद कॉलेज ऑफ फार्मसी, यड्राव), गणेश पनीरे, पंकज नाईक (तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) वारणानगर.) यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि गुणपत्रक देऊन गौरविले. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्झींनी, डॉ. कल्पना पाटील, पदविका विभागप्रमुख रवींद्र पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक प्रा. नुपूर कुलकर्णी, सह. समन्वयक प्रा. वृंदा जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. प्रा. आशाताई पाटील, प्रा. अपर्णा आचार्य यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com