

पट्टी आमदार डॉ. विनय कोरे वाढदिवस विशेष
किमयागार
विधायक विकासाचा तत्त्वनिष्ठ राजकारणाचा शिक्षणातून, परिवर्तनाचा सहकारातून, कष्टकऱ्यांच्या उन्नतीचा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा औद्योगीकरणातून श्रमजीवी कामगारांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार सतत मनी बाळगून त्यासाठी धडपडणारे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त...
...................
त्यांच्या कार्याचा पाया सहकार आहे. स्व. सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी उभा केलेल्या वारणा उद्योग समूहाची जबाबदारी ऐन तारुण्यात विनय कोरे यांनी खांद्यावर घेतली. मुळातच सहकाराचे संस्कार घरातूनच त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांनी देशात अग्रेसर असलेल्या वारणेच्या सहकाराचा डंका पूर्ण देशात दिमाखात खणखणीत वाजविला आहे. शेतकरी कामगार यांच्या हिताच्यादृष्टीने प्रत्येक पाऊल त्यांनी टाकले आहे. मुळातच सहकार सामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीचे माध्यम असल्याने त्यांनी सर्वच संस्था नेटाने चालविल्या आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारातूनच प्रगती साधू शकतो, या भावनेने प्रत्येक संस्थेतील कारभार हा सभासदाभिमुख चालविला आहे. विशेष म्हणजे इथला विशाल पसरलेला सहकार परिसरातील प्रत्येक कुटुंबीयांचा आधार बनून मार्गदर्शक बनला आहे. विनय कोरे यांच्या नेतृत्वाने मोठी शक्ती मिळत असून जगण्याच्या लढाईत त्यामुळे खंबीर आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शेतकरी, सभासद, कामगार यांनी नेहमीच त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करीत त्यांच्या पाठीशी पाठबळ उभे केले आहे. यापूर्वी जे मिळालं ते वारणेमुळे आणि मिळत आहे ती वारणेचीच कृपा आणि यापुढेही जीवन प्रवासाची वाट दाखवेल तो वारणाच असेल, ही दृढ भावना सामान्य माणसांच्या मनात निर्माण होण्यापाठीमागे कोरे यांच्या नेतृत्वाचीच किमया आहे.
- विजयसिंह माने, अंबप
संचालक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
अध्यक्ष श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप.
.............................................
आधारवड
शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, कामगारांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार घेऊन धडपडणारे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त...
....................
वारणा उद्योगसमूह शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रपंचाला झळाळी देणारा ठरला आहे. अत्यंत नेटाने, जोमाने, पारदर्शकपणे ऐटीत चालणाऱ्या या समूहाला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. उलटसुलट चर्चा करून त्यांच्या कर्तबगारीला ब्रेक लावण्याचा उद्योग केला केला. वेगवेगळे प्रश्न चर्चेत ठेवून जाणूनबुजून बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. परंतु विनय कोरे यांच्या लढवय्येपणासमोर यातील कशाचाही टिकाव लागला नाही. प्रचंड अभ्यासू दूरदृष्टी, सूक्ष्म नियोजन याची सोबत आलेल्या कोरे यांच्या नेतृत्वाने अनेकांचा विरोध परतवून लावलाच, पण वारणेची प्रगती कोणी रोखू शकत नाही, याची झलकही दाखविली. त्यामुळे वारणेचा नाद कोणी करायचा नाही. वारणेकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचे नाही, असा इशारा वजा दम देण्यात त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. कोरेंच्या खमक्या विचाराला साथ राहिली ती सामान्य शेतकऱ्यांच्या कृतीची.
वारणा अतिवेगाने धावत प्रगती करीत आहे. प्रगतीचे यशाचे देदीप्यमान सर्वोच्च टप्पे पार करण्यात वारणा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. विनय कोरे यांची विधायक भूमिका समूहाला पुढे नेत आहे. अवाढव्य विशाल असलेला हा समूह लाखो कुटुंबांचा आधारवड आहे. त्यांच्या नेतृत्वाने सहकाराची ख्याती जगभर पसरली आहे. साखर कारखाना, दूध संघ, वारणा बँक, शिक्षण संस्था, वारणा बझार अशा विविध संस्थांच्या मजबुतीकरणास विनय कोरे यांचे नेतृत्व यशदायी ठरले आहे.
सामाजिक राजकीय जीवनात त्यांनी स्वत:ची विचारसरणी जोपासली आहे. जे आपल्याला पटते जे जनतेच्या हिताचे आहे त्याचाच त्यांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे राज्यात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. सत्ता असो किंवा नसो त्यांच्या भूमिकेचा विचार प्रस्थापितांना करावाच लागतो. त्यांनी अपारंपरिक ऊर्जा खात्याची जबाबदारी नुसती पेलेली नाही तर नवकल्पनातून नवा विचार राज्याला देत नावीन्य उपक्रम राबवून कर्तृत्वाची छाप पाडली. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या विचाराला बाजून ठेवून निर्णयच घेता येत नाही. विविध संस्थांच्या बाबतीत त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच पुढे जावे लागते. ज्ञानी अभ्यासू प्रगतीचा नवनिर्मितीचा विचार असणारे हे नेतृत्व सतत लोकहितासाठी कार्यरत असते त्यांच्या वाटचालीस वाढदिवसानिमित्त माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा।
- उत्तम महाडिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.