शिराळे तर्फ मलकापूरचा  बाळकृष्ण मलगुंडे  वारणा कुमार शक्ती श्री चा मानकरी /शिवारेचा विश्वजीत पाटील ठरला उपविजेता

शिराळे तर्फ मलकापूरचा बाळकृष्ण मलगुंडे वारणा कुमार शक्ती श्री चा मानकरी /शिवारेचा विश्वजीत पाटील ठरला उपविजेता

Published on

04885
बाळकृष्ण मलगुंडे वारणा कुमार शक्ती श्री
विश्वजीत पाटील उपविजेता; आमदार विनय कोरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

सकाळ वृत्तसेवा
वारणानगर, ता. २ : आमदार विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या मॅटवरील वारणा कुमार शक्ती श्री किताबासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिराळे तर्फ मलकापूरच्या बाळकृष्ण मलगुंडे याने वारणा शिवारेच्या विश्वजीत पाटीलला चितपट करुन ‘वारणा कमार शक्ती श्री’चा किताब पटकावला. विश्वजितला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
येथील वारणा विविध उद्योग व शिक्षणसमूहाचे प्रमुख आमदार डाॅ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वारणा कुमार केसरी स्पर्धेचे उद्घाटन दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्याहस्ते झाले. दरम्यान आमदार विनय कोरे यांचा वाढदिवस सुराज्य फौडेंशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, संचालक प्रा. जीवनकुमार शिंदे यांच्याहस्ते केक कापून साजरा केला. वारणा कुमार केसरी किताब मिळविलेल्या मल्लांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम देण्यात आली. यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक अभिजीत पाटील, शिवाजी जंगम, सुरेश पाटील, उध्दव पाटील, जनसुराज्यचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, अमरबाबा पाटील, अतुल पाटील, वस्ताद संदीप पाटील, प्रा. के. जी. जाधव उपस्थित होते. यावेळी उध्दव पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. पंच म्हणून विनायक पाटील, धनाजी महाडिक, विलास पाटील, महेश जाधव, जयदीप चव्हाण, जालिंदर पाटील यांनी काम पाहिले. निवेदक म्हणून ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. वस्ताद संदीप पाटील यांनी आभार मानले.

विजेते, उपविजेते असे ः
३० किलो : राजवीर जाधव (तळसंदे), शिवराज पाटील (कांदे).
३५ किलो- श्लोक चेचर (पोर्ले), रोहन शियेकर (पुशिरे),
४० किलो- शुभम बागडी (निलेवाडी), निरंजन कुंभार (कांदे).
४५ किलो- शेखर म्हामूलकर,(साळवाडी), श्रेयश बाऊचकर (नणुंद्रे)
५० किलो-संग्राम गोसावी (कांदे ), प्रतीक वरुटे (कुंभारवाडी).
५५ किलो- पृथ्वीराज कोळी (पारगाव), सचिन चौगुले (पुनाळ)
६० किलो - तय्यब बारगीर (खोची), राजवर्धन चौगुले (आकुर्डे)
६६ किलो- प्रथमेश जाधव (तिरपण), हर्षवर्धन मोळे (घरपण)
७६ प्रथम -कुणाल पाटील (वारणा), समर्थ चौगुले (मांगले)
८४ किलो खुला- बाळकृष्ण मलगुंडे (शिराळे तर्फ मलकापूर), विश्वजीत पाटील (वारणा शिवारे), विनायक राऊत (वाघुर्डे).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com