कोरे फार्मसीत स्टुडन्ट इंडकशन आणि शिक्षक पालक स्नेह मेळावा

कोरे फार्मसीत स्टुडन्ट इंडकशन आणि शिक्षक पालक स्नेह मेळावा
Published on

05035
तात्यासाहेब कोरे फार्मसीत
शिक्षक-पालक मेळावा

वारणानगर, ता. ३ : ‘नवोदित विद्यार्थी व पालक यांना दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी पालक व शिक्षक यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे,’ असे आवाहन विद्यार्थी विकास विभाग वारणा विद्यापीठाच्या संचालिका डॉ. कल्पना पाटील यांनी येथे केले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख उंचावण्यासाठी तसेच शिक्षक व पालक समन्वयातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा करण्यासाठी येथील तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शिक्षक- पालक मेळावा झाला. यावेळी डाॅ. पाटील बोलत होत्या.
भालचंद्र शेटे, निवेदिता मोडक यांच्यासह पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्राचार्य डॉ. किरण पाटील यांनी स्वागत करून आजच्या काळात पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतर्क व जागरूक असणे गरजेचे आहे; असे आवाहन केले. पदविका विभागप्रमुख प्रा. रवींद्र पाटील यांच्यासह पालकांनी मनोगत व्यक्त केले. वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. गायकवाड, प्रा. कुलकर्णी, डॉ. हर्डीकर, प्रा. आचार्य, प्रा. पोवार, प्रा. माळी, लखन करे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com