

5039
वारणानगर : येथे १३ डिसेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे पूजन करताना समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे, वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे, विकास चौगुले आदी.
...............
वारणेत १३ डिसेंबरला
आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
प्रमुख किताबासह लहान-मोठ्या २७५ कुस्त्या
सकाळ वृत्तसेवा
वारणानगर, ता. ३ : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मरणार्थ वारणानगर (ता. पन्हाळा) येथे १३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली. मैदानात प्रमुख किताबासह लहान-मोठ्या अशा २७५ कुस्त्या होणार आहे.
वारणा विद्यालयाच्या क्रीडांगणावर कुस्ती मैदानाची तयारी सुरू झाली असून, श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ करण्यात आला. मैदानात २७५ हून अधिक कुस्त्या होणार आहेत. कुस्ती क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेल्या नामांकीत मल्लांना ‘कुस्तीभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी समन्यवयक प्रा. जीवनकुमार शिंदे, वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, दिलीप महापुरे, ईश्वर पाटील, जे. एस. पाटील, बी. के. धुमाळ, नामदेव केसरे, विकास चौगुले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.