वारणा विद्यापीठ आणि टेलर्स विद्यापीठ मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा
05304
वारणा विद्यापीठ-टेलर्स विद्यापीठ
मलेशिया यांची संयुक्त कार्यशाळा
वारणानगर, ता. १८ : ‘शिक्षणातील उद्देश शिक्षण, सजगता आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या माध्यमातून उच्च शिक्षण संस्थांनी शाश्वत विकासासाठी सकारात्मक भूमिका बजावावी,’ असे आवाहन मलेशियातील टेलर्स विद्यापीठाच्या इम्पॅक्ट लॅब क्लीन टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. प्रवीणा नायर शिवशंकरन यांनी येथे केले.
येथील वारणा विद्यापीठ आणि टेलर्स विद्यापीठ, मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिणामासाठी शिक्षण : उद्देश, सजगता आणि हवामान-जागरूक कृतीद्वारे उच्च शिक्षणाचे रूपांतर’ या संकल्पनेवरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. नागेन्ट्राऊ मुनिअँडी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी उपस्थित होते.
कार्यशाळा पीएमउषा योजनेअंतर्गत उद्देशपूर्ण शिक्षण आणि ग्रीन कॅम्पस विषयावर केंद्रित होती. कार्यशाळेसाठी तात्यासाहेब ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी- डिग्री डिप्लोमा, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी- डिग्री डिप्लोमा, तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी झाले. व्यावसायिक अभियंता आणि ऊर्जा कार्यक्षमता तज्ञ डॉ. नागेन्ट्राऊ मुनिअँडी यांनी ‘कमी कार्बन कॅम्पसच्या दिशेने ऊर्जासंवर्धन’ विषयावर म्हणाले, "शैक्षणिक परिसंस्थांनी ऊर्जा संवर्धनाच्या उपाययोजना राबवून पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारावा.’’ कार्यशाळा पर्यावरण जागरूकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असून, उच्च शिक्षण संस्थांनी शाश्वत भविष्यासाठी कृतिशील होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी वारणा उद्योग व शिक्षण समूहाचा इतिहास व टेलेस युनिव्हर्सिटी मलेशियाबद्दलच्या भविष्यकाळातील योजनांची माहिती दिली.
वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास संचालिका डॉ. कल्पना एस. पाटील, डॉ. उमेश बी. देशन्नवर, प्राचार्य डॉ. बी. टी. साळोखे, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. ए. एम. शेख, प्राचार्य डॉ. किरण पाटील, डॉ. एस. व्ही. खंडाल, डॉ. एस. आर. कुंभर यांनी परीक्षण केले. डॉ. मार्क मोनिस यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

