तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्रचे काखेत  राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर

तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्रचे काखेत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर

Published on

05307

कोरे औषधनिर्माणशास्त्रचे
काखेत श्रमसंस्कार शिबिर

वारणानगर, ता. १९ : येथील तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर काखे (ता. पन्हाळा) येथे विविध उपक्रमांनी झाले.
प्राचार्य डॉ. किरण पाटील यांनी स्वागत केले. सरपंच राजश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शिबिरादरम्यान नवमतदार जनजागृती प्रभातफेरी, औषधनिर्माणशास्त्र विषयावर पथनाट्य, हळदी-कुंकू समारंभ, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, शाळा व मंदिर स्वच्छता, आरोग्य सर्वेक्षण, मोफत नेत्रतपासणी, रक्तदाब, रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी, दंततपासणी, जंतनिर्मूलन गोळ्यांचे वाटप यांसारखे उपक्रम राबविले. गावात धूम्रपानबंदीसाठी ग्रामस्थांकडून स्वयंसेवकांना निवेदन देण्यात आले. डॉ. बबलू वडर यांचे ‘पुस्तक वाचनाचे महत्त्व’ प्रा. मधुकर सुतार यांचे ‘आजचा तरुण आणि संस्कार’ प्रा. जांभळे यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन’ प्रा. कावणे यांचे ‘भ्रमणध्वनीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम’ याविषयी व्याख्यान झाले. महिलांसाठी उखाणे, संगीत खुर्ची, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, गायन, चित्रकला, अंताक्षरी, लिंबू-चमचा स्पर्धा झाल्या. शिबिर आयोजनासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, वारणा विद्यापीठ विद्यार्थी विकास संचालिका डॉ. कल्पना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सी. एम. जमखंडी, समन्वयक प्रा. ओंकार पाटील, सदस्य प्रा. संजय लोहार, नीलेश पाटील, लखन करे, नवनाथ पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी कृष्णकुमार डोंगरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे योगदान, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com