विद्यामंदिर बहिरेवाडीत विज्ञान  प्रदर्शन;  संदीप यादव  यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यामंदिर बहिरेवाडीत विज्ञान प्रदर्शन; संदीप यादव यांच्या हस्ते उद्घाटन

Published on

05370

बहिरेवाडीत विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

वारणानगर, ता. १० ः ‘‘विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यामध्ये क्रियाशीलता निर्माण व्हावी. शालेय वयातील बक्षीस हे जीवनासाठी अविस्मरणीय ठरते. प्रयोगातून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा," असे आवाहन परविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी संदीप यादव यांनी बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे केले.
बहिरेवाडी येथील विद्यामंदिरमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन परविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी संदीप यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच प्रमिलाताई जाधव होत्या.श्री. यादव यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि विज्ञानविषयक ज्ञानाचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना विज्ञानातील नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सरपंच प्रमिलाताई जाधव यांनी शाळेतील उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक दिलीप कुंभार म्हणाले, ‘‘प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होईल आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल." विषयशिक्षक विश्वनाथ बोराटे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी प्रदर्शनासाठी खूप मेहनत घेतली.’ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विविध विषयांवर आधारित अनेक प्रयोग सादर केले. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. केंद्रप्रमुख के. एस. पाटील, शिक्षिका संगीता कावळे, शिक्षक अनिल मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com