

05380
आर्टिफिशिअल इंटेलिजीन्सद्वारे कार्यप्रणाली सुधारा
डॉ. एम. एस. भाटिया; ‘कोरे फार्मसी’त कार्यशाळेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
वारणानगर, ता. १२ : ‘संशोधनामधील जुन्या व नव्या सोयी-सुविधा, उपकरणे व साधने यांच्यातील फरक लक्षात घेता आर्टिफिशियल इंटेलिजन्स संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता असून त्याचा व मानवी बुद्धीची तुलना हा कधीही न संपणारा विषय आहे. परंतु, मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उत्पत्ती केली आहे, हेही विसरून चालणार नाही,’’ असे मत
शिवाजी विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीज (फार्मसी)चे चेअरमन डॉ. एम. एस. भाटिया यांनी येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ, औषधनिर्माणशास्त्र अग्रणी महाविद्यालये (कोल्हापूर विभाग) अंतर्गत कार्यशाळेतील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजीन्स इन हेल्थकेअर अँड रिसर्च’ विषयावरील कार्यशाळेचे आयोजन तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणमध्ये झाले. समारोपाप्रसंगी डाॅ. भाटिया बोलत होते.
तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणचे प्राचार्य डॉ. किरण पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये ‘एआय’च्या विश्वातील मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि नवोपक्रमांची ओळख करून देणे, जे औषध आणि संशोधनाचे भविष्य घडवेल.’’ विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा योग्य वापर करून कार्यप्रणाली सुधारावी, त्यातून स्वतःचे व देशाचे उज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन डाॅ. भाटिया यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ. अमोल दीक्षित यांनी उत्तम करिअरसाठी चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक, व्यावहारिक कौशल्ये व व्यावसायिकतेची क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. नवनवीन संशोधनाचे प्रकार, प्रगत संगणकीय कृत्रिम उपकरणे यांची ओळख व हाताळण्याबाबत प्रात्यक्षिके घेतली. डॉ. एम. एस. भाटिया, प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा व लीड सहाय्यक प्राध्यापकांचा सत्कार झाला. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी फार्मसी कॉलेजचे लीड समन्वयक डॉ. प्रवीण पाटील, प्रा. स्वप्नील हराळे, प्रा. विशाल थोरात यांनी परिश्रम घेतले. प्रा. उत्कर्ष नागवेकर, प्रा.उद्धव आटकीरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.