

05382
प्रा. उदय पाटील यांना पीएच.डी.
वारणानगर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक उदय आनंदराव पाटील (शिगाव) यांना शिवाजी विद्यापीठाची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील पीएच.डी. जाहीर झाली. ‘परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट ऑफ मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना’ विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमधील अँटेनाचा आकार कमी करणे व त्याची कार्यक्षमता वाढवणे या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्यांना साखराळेतील आर. आय. टी. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंदराव बाजीराव काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय शोधनिबंध पत्रिकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.