वारणा महाविद्यालयात परिसस्पर्श योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

वारणा महाविद्यालयात परिसस्पर्श योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Published on

05384

परिसस्पर्श योजनेअंतर्गत
वारणा महाविद्यालयात कार्यशाळा

वारणानगर, ता. १४ : ‘शिक्षण व्यवस्थेत येणाऱ्या बदलात महाविद्यालये टिकवणे व गुणवत्ता पूर्ण वाढ करणे हे आव्हानात्मक काम आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य आणि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसस्पर्श योजनेंतर्गत ‘नॅक ऍक्रेडिटेशन इनसाईटस्: बायनरी प्रपोजल अँड ऑडिट मेथोडोलॉजीज’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील बोलत होते. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. उत्तम कदम यांनी
प्रास्ताविक केले. न्यू कॉलेजचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. नीलेश पवार यांनी बायनरी मूल्यांकन प्रक्रियेत मॅच्युरिटी बेस आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. वारणा महाविद्यालयाचे पीएम-उषा समन्वयक प्रा. व्ही. एस. पाटील यांनी ‘ग्रीन, जेंडर, फायर व सेफ्टी ऑडिट’ विषयावर प्रशिक्षण दिले. कार्यशाळेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी पारंपरिक महाविद्यालयांनी तंत्रस्नेही उपक्रम राबवून समाजाशी अधिक समन्वय साधावा, असे आवाहन केले. ३१ मार्च २०२५ पूर्वी महाविद्यालय लाभार्थी महाविद्यालयांना अधिक सक्षम बनविण्यासाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यशाळेत मार्गदर्शक महाविद्यालयासह शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, मलकापूर, आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोंडीगरे, तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वारणानगर अशा एकूण ६७ प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. समारोप समारंभात डॉ. आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रकाश चिकुर्डेकर, प्रा मुकुंद व प्रा रमेश पाटील ‘नॅक’ला सामोरे जात असताना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. संचिता पाटील, वैष्णवी जाखले, प्रा. उमेश जांबोरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. एस. पांडव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com