सामाजिक शास्त्रातील कोणत्याही एका विषयातील संशोधन करताना सर्व ज्ञानशाखांचे संशोधन करा---- डॉ. अर्चना जगतकर

सामाजिक शास्त्रातील कोणत्याही एका विषयातील संशोधन करताना  सर्व ज्ञानशाखांचे संशोधन करा---- डॉ. अर्चना जगतकर
Published on

05409

सर्व ज्ञानशाखांच्या दृष्टीने संशोधन परिपूर्ण
डॉ. अर्चना जगतकर; वारणा महाविद्यालयात कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

वारणानगर, ता. २८ : ‘‘सामाजिक शास्त्रातील कोणत्याही एका विषयातील संशोधन सर्व ज्ञानशाखांच्या दृष्टिकोनातून केल्यास ते परिपूर्ण व उपयुक्त होईल,’’ असे मत शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा व न्यू कॉलेज, कोल्हापूर येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर यांनी येथे व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोलशास्त्र, राज्यशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवाजी विद्यापीठाच्या ''परिस्पर्श योजने''अंतर्गत ‘नॅक’ फ्रेमवर्कमध्ये एकात्मिक सामाजिकशास्त्र संशोधन : बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून आव्हानांचा शोध"वरील कार्यशाळेच्या उद्घाटक व बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. ए. एम. शेख होते.
प्राचार्य ए. एम. शेख यांनी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नैसर्गिक शास्त्रांबरोबरच सामाजिक शास्त्रेही कशी महत्त्वाची आहेत हे अधोरेखित केले. दुसऱ्या सत्रात वाळवा क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख भारतभूषण माळी यांनी ऐतिहासिक संदर्भ देत आंतरविद्याशाखीय संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे प्रा. अभिजीत पाटील यांनी संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासास तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज स्पष्ट केली.
समारोपात अर्जुननगर देवचंद कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष जाधव यांनी सामाजिक शास्त्रांमधील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. उमेश जांभोरे यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. सहभागी प्राध्यापक - विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले. कार्यशाळेत शोभाताई कोरे कन्या महाविद्यालय मलकापूर, घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर, यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय कोडोली, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर महाविद्यालयातील ७५ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होते. कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयक प्रा. उमेश जांभोरे, संघटन सचिव प्रा. सी. आर. जाधव आणि प्रा. दिनेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. ए. एम. शेख व आयक्यूएसी समन्वयक यू. डी. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com