आमदार डॉ विनय कोरे यांच्या संकल्पनेतुन दुर्गम भागातील शिक्षणापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवी दिशा देणारा उपक्रम ''उमंग''-- ईशानी कोरे

आमदार डॉ विनय  कोरे यांच्या संकल्पनेतुन दुर्गम भागातील शिक्षणापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास नवी दिशा देणारा उपक्रम ''उमंग''-- ईशानी कोरे
Published on

05628


‘उमंग’मुळे शिक्षणास नवी दिशा
ईशानी कोरे; शाहूवाडी- पन्हाळ्यात शैक्षणिक साहित्य वाटप

वारणानगर, ता. १६ : ‘‘शाहूवाडीतील दुर्गम व डोंगरी भागातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मैलोनमैल करावी लागणारी पायपीट वारणा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून थांबविणार आहे,’’ अशी माहिती ईशानी विनय कोरे यांनी दिली.
शाहूवाडी-पन्हाळ्याच्या दुर्गम भागामध्ये मुला-मुलींच्या अखंडित शिक्षणासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाने सुरू ‘उमंग’ उपक्रमाचा प्रारंभ कोतोली, धनगरवाडा, माळेवाडी येथे झाला. यावेळी ईशानी कोरे बोलत होत्या.
या दुर्गम भागातील मुले-मुली माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुला-मुलींना शिक्षकाचा हक्क मिळवून देण्यासाठी व लहान मुला-मुलींवर होणा-या वन्यजीवांच्या हल्ल्यांचा गांभार्याने विचार करून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या संकल्पनेतून वारणा विभाग शिक्षण मंडळ ''उमंग'' नावाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. माळेवाडी, कासारवाडी, सावर्डी, कुंभवडे, मठ गजापूर, कोतोली धनगरवाडा येथे शाळा सुरू होत असून या गावांच्या आसपासची १५० ते २०० मुले-मुली शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत. यासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळ स्व-निधीतून प्रशासकीय, शैक्षणिक खर्च, शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम करणार असल्याचेही ईशानी कोरे यांनी सांगितले. यावेळी वारणा महिला पतसंस्थेच्या संचालिका शारदा महाजन, विस्ताराधिकारी सदाशिव थोरात, केंद्रप्रमुख सुनील सुतार,
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, माजी सरपंच पांडुरंग पाटील, अशोक कुंभार, बाबूराव कोळापट्टे, सखाराम कोळापट्टे, जयराम डोईफोडे, मुख्याध्यापक बाळू सोरटे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com