औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापन समाजाच्या आरोग्याशी निगडित --डॉ. नितपालसिंग

औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापन समाजाच्या आरोग्याशी निगडित --डॉ. नितपालसिंग
Published on

औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापन
समाज आरोग्याशी निगडित ः डॉ. सिंग

वारणानगर, ता. १० : ‘‘औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापन केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून, समाजाच्या आरोग्याशी निगडित जबाबदारीचे क्षेत्र आहे. योग्य शिक्षण, कौशल्ये आणि दृष्टीकोन असल्यास या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येऊ शकते,’’ असे मत ‘आरआयआयएम’ पुणेचे उपसंचालक डॉ. नितपालसिंग यांनी येथे व्यक्त केले.
वारणा विद्यापीठअंतर्गत तात्यासाहेब कोरे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वारणानगर येथे विद्यार्थ्यांसाठी औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापनातील करिअर संधी विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान डॉ. नितपाल सिंग बोलत होते.
डॉ. सिंग म्हणाले, ‘‘नेतृत्व व निर्णयक्षमता, संवादकौशल्य, विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता, तांत्रिक ज्ञान आदी कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत.’’ संशोधक विद्यार्थी गणेश पाटील यांनी औषधनिर्माणशास्त्र व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी, औषध उद्योगाची सद्यःस्थिती, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि व्यवस्थापनातील महत्त्वाच्या भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्राची माहिती करून घेत करिअर सक्षम करावे, असे आवाहन केले. माजी विद्यार्थी संघटना समन्वयक डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी प्राचार्या डॉ. कल्पना पाटील व प्रभारी प्राचार्य डॉ. अमोल शेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन केले. डॉ. एम. व्ही. शिंदे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. आमदार विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डी. टी. शिर्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com