

06681
वारणा, कडवी नद्यांचे जलकलशाचे
आमदार विनय कोरे यांच्याहस्ते पूजन
वारणानगर, ता. २८ : ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जलव्यवस्थापनाचा वारसा पुढे नेणे, शाश्वत पाणी नियोजन आणि जलसंवर्धन जनजागृती करण्यासह हा पंधरवडा अहिल्यादेवींच्या आदर्श जलव्यवस्थापनाची आठवण करून देणारा आणि पाणी वाचवण्याचा संदेश देणारा उपक्रम आहे,’’ असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी येथे केले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २५ ते २९ एप्रिल कालावधीत गोदावरी ते नर्मदा जलयात्रा होणार आहे. पवित्र नद्यांचे जलकलश पूजा करून माहेश्वरला नर्मदा नदीत अर्पण करण्यात येतील. येथे वारणा व कडवी नदीतील जलकलशाचे पूजन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, पाटबंधारे विभाग व वारणा पाटबंधारे उपविभाग कोडोली यांच्या वतीने येथे जलकलश पूजन झाले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पाटील यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आमदार अशोकराव माने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पाटील, शाखाधिकारी खंडेराव गाडे, वारणावतीचे सुदाम कुंभार, कोडोली विभागाच्या नेहा देसाई, येल्लूरचे जयेश यादव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.