
राशिवडे कार्यक्रम
03226
राशिवडे बुद्रुकला
वाहन प्रदान कार्यक्रम
राशिवडे बुद्रुक ता. २८ : राष्ट्रीयीकृत बँकांमधून नागरिकांनी स्वतःसह गावाची पत वाढवून शासनाच्या उद्योग योजनांचा लाभ घ्यावा. तरुणांनी स्वतःचे व्यापार- उद्योग उभारावेत, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते येथे मुख्यमंत्री उद्योजक निर्मिती कार्यक्रमअंतर्गत लाभार्थ्यांना वाहन प्रदान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी एकनाथ चौगले होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘आजवर कर्ज उचलून परतफेड न झाल्याने अनेक गावांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देण्याचे धाडस करीत नाहीत. मात्र नव्या पिढीकडे उद्याचे यशस्वी उद्योजक या दृष्टीने पाहून बँकांनीही धाडस करावे आणि लोकांनी चांगली संधी समजून नवनवे उद्योग निर्माण करावेत. कर्ज परतफेड वेळेत करावी.’ याप्रसंगी माजी सरपंच सागर धुंदरे, अध्यक्ष श्री. चौगले, उद्योग भवनाचे संकेत कदम, बँक ऑफ इंडिया राशिवडे शाखाधीकारी प्रतापसिंह शेखावत, एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक मनीष बोराडेंसह विविध राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, सदस्य, गजानन बिल्ले, आनंदा शिंदेंसह व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.
यावेळी फिरते व छोटे व्यवसाय करणाऱ्यांना पंधरा मालवाहू वाहनांचे आमदारांच्या हस्ते वितरण झाले.