काँग्रेस कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस कार्यक्रम
काँग्रेस कार्यक्रम

काँग्रेस कार्यक्रम

sakal_logo
By

03235

‘हाथ से हाथ जोडो’
अभियानाचा परितेत प्रारंभ

राशिवडे बुद्रुक, ता. २७ : देश खासगी उद्योगपतींच्या ताब्यात जात आहे. याविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा यशस्वी करून ‘हाथ से हाथ जोडो’चा नारा दिला. हे अभियान घरोघरी राबवून काँग्रेसचा हात बळकट करा, असे प्रतिपादन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांनी केले.
ते परिते (ता. करवीर) येथे अभियानाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, ‘देशात महागाईने कळस गाठला असून ३६० रुपयाचे गॅस सिलिंडर १०७० वर पोचले. पेट्रोल, डिझेल दरवाढीने विक्रमी पातळी गाठली. केंद्र शासन भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवून देशाला खासगीकरणाच्या खाईत लोटत आहे. राहुल गांधींचा हाथ से हाथ जोडोचा नारा घराघरांत पोचवावा.’
आनंदा ढेरे यांच्या हस्ते अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी भाजपच्या जनहितविरोधी धोरणांचे पर्दाफाश करणाऱ्या माहितीपत्रकांचे वाटप केले. पदयात्रा काढून आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भोगावती उपाध्यक्ष कारखान्याचे माजी उपाध्यक्ष एम. आर. पाटील, संदीप पाटील, डी. आय. पाटील, शिवाजीराव कारंडे, मारुतराव जाधव, हिंदुराव चौगले, धीरज डोंगळे, सुनील खराडे, मोहन डवरी, बी. आर. पाटील, बळवंत पाटील, बी. ए. पाटील, पांडुरंग पाटील, बबन रानगे, पांडुरंग भांदिगरे, आजी-माजी संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.