Sun, March 26, 2023

बागेला आग
बागेला आग
Published on : 10 March 2023, 3:58 am
राशिवडेत आंबा बागेस आग;
अडीच लाखांचे नुकसान
राशिवडे बुद्रुक: येथील अशोक केरबा मगदूम यांच्या सुमारे दहा एकर क्षेत्रातील आंबा बागेस आग लागून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. बागेभोवती जाळपट्टा मारूनही या बागेस वणवा लागला. या घटनेचा पंचनामा तलाठी शहाजी चिंदगे, पोलीस पाटील उत्तम पाटील यांनी केला.
मगदूम यांची येथील ‘ढोकर दरा’ परिसरात २० वर्षांची आंबा बाग आहे. यात फळे देणारी ४५० झाडे आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जतन केलेल्या या बागेला शुक्रवारी(ता.१०) दुपारी अचानक आग लागली. यामध्ये झाडे व फळांसह नवी पालवी व मोहर जळाला.