रस्ता काम

रस्ता काम

फोटो
....

शेळेवाडी फाटा ते परिते
रस्त्याचे काम संथगतीने

पर्यायी रस्त्यावरून वाहतूक धोक्याची

राशिवडे बुद्रुक, ता. १० : शेळेवाडी फाटा ते परितेपर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने चालू असल्याने प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे. ठिकपुर्ली येथे पुलाचे काम सुरू केल्याने पर्यायी रस्त्यावरून वाहतूक धोक्याची बनली आहे.
कोल्हापूर -परिते -ठिकपुर्ली ते गारगोटी अशा मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू आहे. हे काम गेली चार वर्षे रेंगाळले होते. त्यामुळे कोल्हापूर ते भोगावतीपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत खडतर बनला होता. यंदा याच्या कामाला गती आली आहे. परंतु छोट्या पुलांचे बांधकाम गतीने झालेले नाही. अशातच परिते येथे मुख्य रस्त्याचे काम सिमेंट काँक्रीटचे सुरू आहे. त्याची एक बाजू पूर्ण झाली असली तरी दुसरी बाजू अत्यंत कासवगतीने केली जात असल्याने येथे अपघात क्षेत्र बनले आहे.
हाच मार्ग पुढे शेळेवाडीतून गारगोटी मार्गाला जोडला जात आहे. या चार किलोमीटरच्या मार्गाचे काम हवे तितके समाधानकारक दिसत नाही. अशातच ठिकपुर्ली येथील रुंदीकरणासाठी पूल उभारणीचे काम सुरू झाले आहे. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून गाव- शिवारातून काढण्यात आला आहे. मात्र अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहने जाणे -येणे अडचणीचे ठरत आहे. ही कामे तातडीने करावीत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com