राधामगरीत पाणीसाठा कमी

राधामगरीत पाणीसाठा कमी

02318
राधानगरी ः मेच्या सुरवातीलाच राधानगरी धरणात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.मंगळवारी दुपारी घेतलेले छायाचित्र. ( राजू कुलकर्णी सकाळ छायाचित्रसेवा)

गतवर्षीपेक्षा साडेसहा टीएमसी कमी
काटेकोर नियोजनाची गरज; राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी धरणातील चित्र
राधानगरी, ता. २ : यंदा आजमितीस राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी धरणात गतवर्षीच्या तुलनेत साडेसहा टीएमसी इतका पाणीसाठा कमी आहे. सात वर्षानंतर यंदा या धरणातील पाणीसाठा निचांकी ठरला आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठा वापराच्या काटेकोर नियोजनामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी तुटवड्याची शक्यता नसल्याचा दावा जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केला आहे.
शेती व पिण्यासाठी मे आणि जून अखेरपर्यंत सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे. तरीही अल-निनोच्या प्रभावाने मान्सून लांबण्याच्या अंदाजाने परिस्थितीनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करावे लागणार आहेत. सर्वाधिक कमी म्हणजे १७.७७ टक्के (४.२६ टीएमसी) पाणीसाठा काळम्मावाडी धरणात आहे. गतवर्षी आज घडीला ९.८९ टीएमसी इतका पाणीसाठा होता.
राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा जवळपास एक, तर तुळशीत अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. राधानगरी ३४.५९ टक्के, तर तुळशीत ४२.६३ टक्के पाणीसाठा उरला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये या धरणात मे महिन्यात कमी पाणीसाठा होता. त्यावेळीही पाणी वापराच्या नियोजनातून संभाव्य पाणीटंचाईवर जलसंपदा विभागाने मात केली होती. यंदाही पावसाळा सुरू होईपर्यंत तिन्ही धरणांच्या लाभक्षेत्रातील पाणीटंचाई सावट दूर करण्यास जलसंपदा विभागाची कसोटी पणाला लागणार आहे.
-----------------
ग्राफ
धरणातील पाणीसाठ्याची स्थिती
१ मे २०२३
राधानगरी - २.६९ टीएमसी
काळम्मावाडी - ४.२६ टीएमसी
तुळशी - १.३८ टीएमसी

१ मे २०२२
राधानगरी - ३.८० टीएमसी
काळम्मावाडी - ९.८९ टीएमसी
तुळशी - १.९१ टीएमसी
-----------------
चौकट
पाणीटंचाईची शक्यता
पावसाळा लांबल्यास राधानगरी तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता अधिक आहे. याचा सर्वात मोठा फटका या तिन्ही नद्यांच्या काठावरील ऊस पिकांना बसणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आधीच उपसा बंदी व पाळी पत्रक असल्याने पिकांना उशिरा पाणी मिळत आहे. अशात टंचाई निर्माण झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. यामुळे शेतकरी आतापासूनच हवालदिल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com