१२ तासात चोरी उघड

१२ तासात चोरी उघड

03339
विनायक कुंभार
03340
विजय कुंभार

ट्रेलरची चाके चोरणारे
बारा तासात जेरबंद

राशिवडे बुद्रुक, ता. २ : मोकळ्या जागेत लावलेल्या टॅक्टर ट्रेलरची चाके अज्ञाताने चोरून नेल्याची घटना येळवडे (ता. राधानगरी) येथे घडली. हा गुन्हा राधानगरी पोलिसांनी केवळ बारा तासाच्या आत उघडकीस आणला. या प्रकरणी विनायक शिवाजी कुंभार व विजय आनंदा कुंभार (रा. सांगरुळ) या दोघांना अटक केली आहे.येथील कृष्णात ईश्‍वरा पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आहेत. त्यांनी आपले दोन ट्रेलर राशिवडे- येळवडे दरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूच्या दत्त मंदिरा शेजारील शेतात लावले होते. काही अज्ञात चोरटे दुचाकी ट्रेलरचे दोन्ही चाके व चार चाकी पैकी एक चाक काढून घेऊन पसार झाले होते. ही घटना आज सकाळी पाटील यांच्या निदर्शनास आली. यानंतर याबाबतची रितसर फिर्याद राधानगरी पोलिस ठाण्यात दिली. या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता या परिसरात एक मोटार (एम एच 09 -9360) संशयास्पद रित्या फिरतानाची माहिती मिळाली.
या गाडीची चौकशी केली असता संबंधित गाडी हे सांगरूळमधील विनायक शिवाजी कुंभार यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. या चा तपास केला असता विनायक ही गाडी घेऊन कोल्हापूरात गेल्याचे कळले. तिथून गाडीसह संशयीत ताब्यात घेतले. तपासणी केली असता विनायकने आपण विजय आनंदा कुंभार यांच्या मदतीने ही चाके काढून चोरी केल्याची कबुली दिली. या कामी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड; उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे'' नाईक अरविंद पाटील, के. डी. लोकरे; गजानन गुरव'' रोहित खाडे'' रणधीर वरुटे'' कृष्णात साळोखे'' कृष्णात यादव हे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com