

‘भोगावती’साठी कुरुकलीत
विरोधी गटाची बैठक
राशिवडे बुद्रुक, ता. १६ : भोगावती कारखाना खरोखरच वाचवायचा असेल, तर आम्ही बिनविरोधसाठी तयार आहोत. मात्र, गेल्या पाच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झालेत काय? याचा खुलासा सभासदांनी करावा, असे मत कुरुकली (ता. करवीर) येथे झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत सर्वांनी व्यक्त केले.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील होते. याप्रसंगी माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील म्हणाले, ‘‘कारखाना रोज कर्जाच्या खाईत रुतत आहे. रोज १५ लाख रुपये म्हणजे महिन्याला साडेचार कोटी रुपये निव्वळ व्याज बँकेला जाते. अशा स्थितीत कारखाना वाचवणे हा एकमेव पर्याय आहे. जर त्या दृष्टीने निर्णय होत असेल, तर निश्चितच स्वागत आहे.’’ माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले म्हणाले, ‘‘सभासदांचे हित लक्षात ठेवून प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.’’
या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, के. बी. पाटील, अजित पाटील, शिवाजी सावंत, एम. टी. डोंगळे, एम. आर. पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी निवास पाटील, विश्वास पाटील, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, बाजीराव चौगुले, सज्जनराव पाटील, सुभाष जाधव, अण्णाप्पा चौगुले, सुभाष पाटील, मोहन धुंदरे, कार्यकर्ते उपस्थित होते. नामदेवराव पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.