राधानगरी धरण भरले

राधानगरी धरण भरले

B02497
राधानगरी ः पाणलेट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणात पाण्याची आवक वाढली आणि बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत सात स्वयंचलित दरवाजांपैकी पाच दरवाजे खुले होऊन भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाला. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)

राधानगरी धरण भरले
पाच स्वयंचलित दरवाजे खुले; सात हजारांवर विसर्ग
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. २६ : येथील राधानगरी धरण आज बुधवारी सकाळी भरले आणि धरणाच्या सातपैकी पाच स्वयंचलित दरवाजे दुपारपर्यंत खुले झाले. क्रमांक एकचा दरवाजा अर्धवट स्थितीत खुला आहे. पाचही दरवाजातून ७१४० क्युसेक, तर विजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची पातळी ३४७.५० फूट झाल्यानंतर स्वयंचलित दरवाजे टप्प्याटप्प्याने खुले होतात. मात्र, आज पाणी व जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आज सकाळी सव्वाआठ वाजता पाणीपातळी ३४७.२० फुटांपर्यंत पोहचली असतानाच सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर पाणीपातळी वाढ होईल तसे दुपारी दीडपर्यंत पाच, तीन, चार आणि सात क्रमांकाचे दरवाजे खुले झाले. सायंकाळी क्रमांक एकचा दरवाजा अर्धवट स्थितीत राहिला असून, पाणीपातळी वाढल्यास तोही खुला होऊ शकतो किंवा दाब कमी झाल्यास बंद होऊ शकतो. त्यातून पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे.
गतवर्षी धरण १० ऑगस्टला पूर्ण भरले होते. त्यावेळी धरण क्षेत्रात २१७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा धरण पंधरा दिवस अगोदरच भरले. धरण व पाणलोट क्षेत्रात अठरा जूनपासून पावसाला सुरुवात झाली. जुलैमध्ये धरण व पाणलोट क्षेत्रात सलग अतिवृष्टी आणि कमी काळात अधिक पाऊस झाल्याने धरण ३७ दिवसातच भरले. यंदा आज अखेर धरण क्षेत्रात २२८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस सुरू होण्याआधी धरणात जेमतेम एक टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदाच्या पावसाळ्यात सर्वात आधी पूर्ण भरलेला पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. स्वयंचलित दरवाजांचे परिचलन गेली ७८ वर्षे अखंडितपणे सुरळीत सुरू आहे. यापूर्वी धरण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा भरले होते.
दरम्यान, पडळी ते हत्तीमहाल दरम्यान असलेल्या भोगावती नदीवरील पुलावर बघता बघता पाणी आले पूल पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद झाला तरीही धोका पत्करून काही लोक यातून मार्ग काढत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com