सरपंच निवड

सरपंच निवड

Published on

03619
खिंडी व्हरवडे सरपंचपदी निवेदिता गुरव
आवळी बुद्रुक : खिंडी व्हरवडे (ता.राधानगरी ) येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी निवेदिता निवृत्ती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रवीण पाटील होते. आघाडीतील समजोत्यानुसार सरपंच सपना राजकुमार पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदी निवड झाली. यावेळी भोगावतीचे संचालक जयवंत कांबळे, डॉ. बाजीराव खांडेकर, रामभाऊ पाटील, एस. के. पाटील यांची भाषणे झाली. यावेळी राजाराम पाटील, शिवाजी पारखे, राजकुमार पाटील, अर्जुन पाटील, अशोक सावंत, चंद्रकांत तोरस्कर, मारूती जाधव, डी. एम. पाटील उपस्थित होते. यावेळी ग्रामसेविका जयश्री चौगले यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते. उपसरपंच शशिकांत गुरव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.