अजब निवडणूक

अजब निवडणूक

राधानगरीत प्राथ. शिक्षक पतसंस्थेच्या
बिनविरोध निवडणुकीसाठी पुन्हा मतदान
राधानगरी, ता. ३ : राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक आज अजबरितीने पार पडली . बिनविरोध होऊनही मतदान झाले. तेही ६१३ पैकी केवळ दोघांनीच मतदान केले.
त्याचे झाले असे : बिनविरोधासाठी सहमती आणि समझोत्याच्या चर्चेतून अर्ज दाखल १२७ उमेदवारांतून १९ जागा बिनविरोध निश्चित झाल्या. मात्र विनाविरोधासाठीची चर्चा लांबतच राहिली. तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत संपली. उर्वरित उमेदवारांची अर्ज माघारी झाली नाही. अखेर तांत्रिक कारणाने निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पार पाडावी लागली. आज मतदान झाले. १९ जागांच्या बिनविरोधचा तोडगा आधीच झाल्याने संस्थेच्या ६१३ मतदारांपैकी अवघ्या दोनच मतदारांनी मतदान केले.
सायंकाळी मतमोजणी झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था ) युसूफ शेख यांनी अधिकृत निकाल घोषित केला. त्यात दिलीप चौगले . विशवनाथ चौगले, शाहू चौगले, मंगेश धनवडे, दिलीप पाटील, बळवंत पाटील, संजय भित्तम, संजय भोसले, रामकृष्ण पोवार, विलास मुसळे, आनंदा मोगणो. रणजित रेडेकर, जालिंदर साबळे, संतोष कांबळे, सुरेश गुर, मछिंद्र मोहिते, संजय बरगे शुभांगी मिळपणकर, शितल मोरस्कर हे एकोणीस उमेदवार विजयी घोषित झाले. त्यांना प्रत्येकी दोन मते मिळाली. उर्वरीत १०८ उमेदवारांना एकही मत मिळाले नाही. बिनविरोधनंतर इतर उमेदवारांची अर्ज माघारी वेळेत झाली नसल्याने तांत्रिक कारणाने झालेली निवडणूक चर्चेचा विषय ठरली.

कोट
संस्था स्तरावर निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाला. अर्ज माघारी विहित कालावधीत झाला नाही. संचालकांच्या संख्येपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज शिलक राहिल्याने नियमानुसार निवडणूक प्रक्रिया करावी लागली. दोनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत निकाल घोषित केला.
- युसूफ शेख सहाय्यक निबंधक, राधानगरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com