थायलेरियाच्या उच्चाटनासाठी गोकुळतर्फे जिल्ह्यात लसीकरण

थायलेरियाच्या उच्चाटनासाठी गोकुळतर्फे जिल्ह्यात लसीकरण
Published on

04093
पुंगाव : गोकुळ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना किसन चौगले.
......

थायलेरियाच्या उच्चाटनासाठी
गोकुळतर्फे जिल्ह्यात लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. १ : दुधाळ जनावरांसाठी घातक ठरलेल्या थायलेरिया आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी गोकुळने मोफत थायलेरिया प्रतिबंधक लसीकरण आणि गोचीड निर्मूलन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २२० गावांत प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी दिली.
पुंगाव (ता. राधानगरी) येथे गोकुळच्या थायलेरिया लसीकरण आणि गोचीड निर्मूलन मोहिमेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक भांदिगरे होते. थायलेरियावर वेळीच उपचार न झाल्यास जनावर दगावण्याचा धोका असून दूध उत्पादकांनी जनावरांना लसीकरण करून संभाव्य धोके टाळावेत, असे आवाहनही प्रा. चौगले यांनी केले.
याप्रसंगी गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी बी. एम. पवार यांनी थायलेरियाची लक्षणे, प्रादुर्भावानंतर घ्यावयाची दक्षता, लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रा. चौगले यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास लक्ष्मण पाटील, श्रीकांत कुलकर्णी, युवराज बरगे , दशरथ भिवसेकर, विठ्ठल पाटील, दत्तात्रय पाटील, बाबूराव परिट, सागर पाटील, आदी उपस्थित होते. संतोष चौगले यांनी स्वागत केले. तुषार खराडे यांनी आभार मानले.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com