विठ्ठलाई देवीस पितळेची प्रभावळ अर्पण

विठ्ठलाई देवीस पितळेची प्रभावळ अर्पण

04388, 04387
कसबा तारळे : येथील देवी श्री विठ्ठलाईच्या चरणी प्रभावळ अर्पण करताना पोतदार परिवार व देवीचे खेळे मंडळ. दुसऱ्या छायाचित्रात प्रभावळीच्या मिरवणुकीत सहभागी पोतदार परिवारातील महिला. (सुरेश साबळे : सकाळ छायाचित्रसेवा)
.....................
विठ्ठलाई देवीस पितळेची प्रभावळ अर्पण

कसबा तारळेतील पोतदार परिवाराकडून पावणे दोन लाखांचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. १४ : येथील देवी श्री विठ्ठलाईच्या चरणी येथील पोतदार (दैवज्ञ) परिवाराकडून पितळेची भव्य प्रभावळ अर्पण करण्यात आली. यासाठी संपूर्ण पोतदार परिवार व त्यांच्या माहेरवाशिणींकडून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.
जिल्ह्यातील श्री विठ्ठलाई देवीची ख्याती आहे. चौदा मानकरी कुटुंबांचे मिळून बनलेल्या पारंपरिक श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाकडून मंदिराचे व्यवस्थापन तसेच वर्षातून एकदा भरणाऱ्या व पंधरा दिवस चालणाऱ्या देवी श्री विठ्ठलाईच्या यात्रोत्सवाचे व्यवस्थापन केले जाते. याशिवाय दरवर्षी देवीचा वाढदिवस, कुंकुमार्चन सोहळा आणि दसऱ्यादरम्यान नऊ दिवस नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. या खेळे मंडळामध्ये पोतदार घराण्याला मानाचे स्थान आहे. यात्रोत्सवात पंधरा दिवस रोज रात्री निघणाऱ्या गाऱ्हाण्याच्या फेऱ्याची सुरुवातही परंपरेप्रमाणे प्रणव पोतदार यांच्या घरापासून होते. येथे पोतदार परिवाराशी संबंधित दहा ते बारा कुटुंबे आहेत. या सर्वांसह या कुटुंबाशी संबधित माहेरवाशिणींनी मिळून देवीसाठी प्रभावळ देण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी गेल्या यात्रोत्सवादरम्यान घेतला होता. त्याला अनुसरून मुख्य देवीची प्रभावळ देवीच्या चरणी नुकतीच अर्पण केली असून, देवीच्या मंदिरातील श्री गणपती व श्री तारकेश्वर (महादेव शिवलिंग) यांच्यासाठी दोन प्रभावळी तयार होत आहेत.
दरम्यान, देवीसाठीच्या मुख्य प्रभावळीची गावातून सवाद्य मिरवणूक काढून ती विधिवत देवीच्या चरणी अर्पण केली. श्री गैबी-विठ्ठलाई खेळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोतदार परिवाराकडून ती स्वीकारली. लगेचच देवीचे स्त्रोत्र व मंत्रोच्चाराच्या जयघोषात ती मूर्तीसभोवती बसविण्यात आली.
.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com