गव्यांचे मानवावरील जीवघेणे हल्ले चिंताजनक

गव्यांचे मानवावरील जीवघेणे हल्ले चिंताजनक

गव्याचा फोटो वापरावा...
............
गव्यांचे मानवावरील जीवघेणे हल्ले चिंताजनक

वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज

राजू पाटील ः सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. १६ : जिल्ह्यात अलीकडे दिवसेंदिवस गव्यांचे माणसावर होणारे हल्ले वाढू लागले आहेत. जंगलात नष्ट होणारी गवताची कुरणे, पाण्याची कमतरता, मानवी हस्तक्षेप आणि उत्खनन यासह जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढल्याने बिथरलेले गवे मानवी वस्तीकडे वळत आहेत. शिवारातील पिकांकडे त्यांचा मोर्चा वळल्याने अशा घटना घडत आहेत. याकडे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
तालुक्यात ३५१ चौरस किलोमीटर व्याप्ती असलेल्या दाजीपूर-राधानगरी अभयारण्यात गव्यांची संख्या विपुल आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वन्यजीव विभागाचे आजवर प्रयत्न होते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत येथील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी फारशा उपाययोजना केल्याचे दिसत नाही. केवळ झरे आणि तळी खोदाई एवढेच प्रयत्न वन्यजीव विभागाने केले आहेत. खरे तर प्राणी जंगलाबाहेर का येतात, याचा अभ्यास व्हायला हवा. मात्र, त्याबाबत गांभीर्य नाही.
मोठ्या प्रमाणात असलेली जंगलातील गवताची कुरणे नष्ट झाली आहेत. त्या ठिकाणी कारवी व झाडेझुडपे वाढली त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांना पोट भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याचे साठे एप्रिल, मेमध्ये अटतात. अशावेळी हे प्राणी नदी, तलावाकडे तहान भागवण्यासाठी वळतात. साहजिकच या मार्गावर असलेल्या शिवारातील हिरव्यागार पिकांची त्यांना भुरळ पडते आणि ते आपला मोर्चा तिकडे वळवतात. परिणामी मानव आणि प्राणी संघर्ष सुरू होतो. अलीकडच्या चार वर्षांत जंगलांना आगी लागण्याचे-लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातून वनसंपदा नष्ट होत आहे.
गेल्या दोन महिन्यांत तीन ठिकाणी गव्याने मानवावर हल्ले केले. हत्तीमहाल येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालय परिसरात शेतमजुरावर हल्ला झाला. त्यानंतर पर्यटकांच्या मोटारीवरच थेट उडी घेतल्याने तिघे जखमी झाले. आठ दिवसांपूर्वीच दुर्गमानवाड, धुमाळवाडी परिसरातील एका शेतात काम करणाऱ्या निलोफर पन्हाळकर या महिलेवर थेट हल्ला केला. गैबी, फराळे, मांजरखिंड परिसरातील खणीकर्म, स्टोनक्रशर, दुर्गमानवाड परिसरात बॉक्साईटचे चोरटे उत्खनन गव्यांना बिथरण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र, महसूल विभागाला याकडे लक्ष देण्यास वेळच नाही. वन्यप्राण्यांसाठी चारा, पाणी आणि शांतता याचा अभाव दिसू लागल्याने या घटना घडत आहेत.
.......
चौकट :

मानव-जंगली प्राणी संघर्षाची कारणे...

जंगलातील गवताची कुरणे नष्ट होणे
उन्हाळ्यात पाणीसाठ्यांचा अभाव
जंगलांना वणवे लावण्याचे-लागण्याचे वाढते प्रमाण
हिरव्या चाऱ्यासाठी शिवारात शिरकाव
दुर्गमानवाड परिसरात चोरट्या मार्गाने बॉक्साईट उत्खनन
प्राण्यांच्या अधिवासावर वाढते मानवी अतिक्रमण
...........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com