राधानगरी मार्गावर झाडाच्या बुंध्यांना आग

राधानगरी मार्गावर झाडाच्या बुंध्यांना आग

04475
आणाजे : कोल्हापूर-राधानगरी मार्गावर जाळलेली झाडे रस्त्यावर कोसळत आहेत.
..............

राधानगरी मार्गावर झाडाच्या बुंध्यांना आग

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ः संबंधितांवर कारवाईची गरज

राशिवडे बुद्रुक, ता. १ : कोल्हापूर-राधानगरी मार्गाच्या रुंदीकरणासाठी आधीच झाडांची कत्तल केली आहे. अशातच रस्त्याकडेची जुनी झाडे बुंध्याला आग लावून वठवण्याचे काम शेतकरी वर्गाकडून होत आहे. कालच असे बुंध्याला आग लावलेले झाड पर्यटकाच्या वाहनावर कोसळत होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी वाचले. आणाजे (ता. राधानगरी) गावाजवळ ही घटना घडली. असे प्रकार धोकादायक असून, यावर कोणाचाही अंकुश नाही.
कोल्हापूर आणि निपाणीहून राधानगरीकडे येणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण सुरू आहे. या मार्गावरील शेकडो वृक्ष रुंदीकरणासाठी तोडले आहेत. त्यामुळे आधीच रस्ता उजाड बनला आहे. गर्द झाडीने झाकलेल्या याच जुन्या मार्गावर प्रवास करणे सुखद वाटायचे. आता उन्हाच्या झळा जाणवत आहेत. या मार्गावर दुतर्फा वृक्षलागवड करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती. मात्र, असे घडल्याचे दिसत नाही.
अशातच शेतकऱ्यांकडून नवा फंडा वापरला जात आहे. रस्त्याकडेला असलेल्या ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या झाडांच्या बुंध्याला आग लावली जात आहे. अशा झाडांच्या साली जळाल्यानंतर ते झाड सुकते आणि कालांतराने जीर्ण होऊन रस्त्यावर कोसळते. यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. कोसळलेली झाडे लगेच स्थानिक आणि शेजारचे आरा गिरणीचे मालक तोडून व्यापारही करतात. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. शिवाय वन खातेही दुर्लक्ष करीत आहे. याच मार्गावरून या खात्यांचे अधिकारी ये-जा करतात. त्यांच्या दृष्टीस ही बाब पडत नाही, हेच नवल.
...
चौकट..
झाडाची परस्पर विल्हेवाट
गुरुवारी आणाजेजवळ बुंध्याला आग लागलेले झाड कोसळत असतानाच चालकाच्या प्रसंगावधानाने गोव्याकडे जाणारी प्रवासी गाडी बाजूला ओढली आणि त्याच वेळेला झाड रस्त्यावर कोसळले. लक्ष नसते तर मोठा अनर्थ घडला असता. हे पडलेले झाड स्थानिक व्यापाऱ्याने परस्पर नेल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com