राधानगरी पाऊस

राधानगरी पाऊस

Published on

राधानगरी, काळम्मावाडी
धरण क्षेत्रात अतिवृष्टी
राधानगरी ः राधानगरीसह काळम्मावाडी धरण क्षेत्रात सलग पाचव्या दिवशीही अतिवृष्टी झाली. चोवीस तासांत राधानगरी धरण क्षेत्रात ९६, तर काळाम्मावाडीत ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग सुरू असलेल्या अतिवृष्टीने काळम्मावाडी धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल चार टीएमसीने वाढ झाली आहे. पावसाळ्यापूर्वी धरणात तीन टीएमसी पाणीसाठा होता. सध्या धरणात सात टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गात ५० क्युसेकने वाढ केली आहे. आता धरणातून वीज निर्मितीसाठी १२५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील दाजीपुरात ७२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत आजअखेर दुपटीने पाऊस झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.