पोलीसालाच दमदाटी

पोलीसालाच दमदाटी

Published on

राऊतवाडी धबधबास्थळी
एकाची पोलिसाला दमदाटी
राशिवडे बुद्रुक, ता. ७ : राऊतवाडी येथील धबधबास्थळी हुल्लडबाजांची आरेरावी आता पोलिसांनाही सहन करावी लागत आहे. आज सायंकाळी येथे ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाला दमदाटी करण्याचा प्रकार घडला. त्याच्यावर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
मुसळधार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील सर्वच धबधबे प्रवाहित झाले आहेत. ते पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सुट्टी दिवशी तर ही गर्दी इतकी प्रचंड असते की जमावाला आवरण्यासाठी पोलिस यंत्रणेला सज्ज व्हावे लागते. अनेक हुल्लडबाज आणि मद्यपी पर्यटकांच्यामुळे महिला व कुटुंब वत्सल पर्यटकांना मोठा त्रास होतो. वाहनाचे पार्किंग आणि धोकादायक परिस्थिती यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. आज सायंकाळी येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस नाईक दत्तात्रय जयसिंग शिंदे यांना आपण स्वतः पोलिस असून आपण लोकसेवक आहात असे बोलून दमदाटी कुर्डू (ता .करवीर )येथील पंकज युवराज पाटील या तोतयाने केली. यावेळी झालेल्या बाचबाची नंतर पंकज याच्यावर पोलिस दत्तात्रय शिंदे यांनी गुन्हा नोंद केला. तपास सहाय्यक पोलि निरीक्षक महेश घेरडीकर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.