

एसटी बस
वाहकांत हाणामारी
राशिवडे बुद्रुक ः प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन मिरवणाऱ्या राज्य परिवहन खात्याच्या वाहकांची भोगावती एसटी स्थानकावर चार दिवसांपूर्वी झालेली मारामारी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा प्रकार आणि एसटीच्या कारभाराच्या चौकशीची मागणी होत आहे. वाहकांनी एकमेकांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. येथे बंद पडलेल्या गाडीतील काही प्रवासी घेण्यावरून हा वाद उफाळला. बंद गाडीचे वाहक अशोक बापू कांबळे यांनी आपल्या गाडीतील प्रवासी पाठीमागून आलेल्या गाडीकडे पाठवले. मात्र, यातून बाचाबाची झाली. दुसरे वाहक दत्तात्रय गुरव आणि कांबळे यांच्यात हाणामारी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.