राधानगरी एमआयडीसी निवेदन

राधानगरी एमआयडीसी निवेदन

Published on

विरोध करणाऱ्यांच्या जमिनी वगळून
राधानगरीत एमआयडीसी स्थापन करा

राशिवडे बुद्रुक, ता. ९ : केवळ राजकीय हेतूने ज्यांचा विरोध आहे, त्यांच्या जमिनी वगळून राधानगरी तालुक्यात एमआयडीसी करावी, अशा मागणीचे निवेदन येथील माजी सरपंच सागर धुंदरे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी सरपंचांनी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी तालुका दुर्गम डोंगराळ भागात येतो. त्यामुळे युवकांना नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतर करावे लागत आहे. तालुक्यापासून कागल पंचतारांकीत व गोकुळ शिरगाव एमआयडीसी ४० ते ४५किलो मीटर अंतरावर आहे. तेथे नोकरी-धंद्यासाठी जाणाऱ्यांना प्रवास खर्चासह अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी ज्यांचा विरोध असेल त्यांच्या जमिनी वगळून उर्वरित जमिनी घेऊन विकसितदृष्ट्या मागास राधानगरी तालुक्यात एमआयडीसी होणे गरजेचे आहे. निवेदनावर राशिवडे खुर्दचे सरपंच इंद्रजित पाटील, वाघवडेचे उपसरपंच शिवाजी सरवळकर, के. एल. पाटील (केळोशी), दगडू चौगले (म्हासुर्ली), विलास डवर (डवरवाडी), ओंकार निंबाळकर (राधानगरी), सुभाष पाटील (पुंगाव) आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com