पाणी योजनांच्या मुळावर निधीची कमतरता

पाणी योजनांच्या मुळावर निधीची कमतरता
Published on

संग्रहित फोटो वापरणे...
..................
निधीअभावी रखडल्या पाणी योजना

राधानगरीतील २३ योजनांची कामे पूर्ण, ३६ योजनांची कामांना ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ३० : तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत प्रस्तावित पाणी योजनांच्या मुळावर निधीची कमतरता उठली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ९० योजनांची कामे सुरू आहेत. यातील केवळ २३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, तर ४१ योजनांची कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आली आहेत. उर्वरित ३६ योजनांची कामे तांत्रिक आणि आर्थिक बाबीमुळे रखडत सुरू आहेत. याआधी प्रस्तावित योजनांची कामे मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याची निर्धारित मुदत होती. मात्र, प्रामुख्याने निधी कमतरतेमुळे अपूर्ण योजनांच्या पूर्णत्वासाठीच्या निर्धारित मुदतीत आता आणखी तीन वर्षांची वाढ केली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यात एकाच वेळी सर्वच गावे आणि वाड्यावस्त्यांसाठी योजना प्रस्तावित केल्या. योजनांचे आराखडे-अंदाजपत्रकाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी, निधी तरतूद यातही झालेला विलंब आणि नियोजनशून्यता योजनांसाठी मारकच ठरल्याचे समोर आले आहे. आगामी काळात अपूर्णावस्थेतील योजनांच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्धता आणि कालबद्ध नियोजन झाले तरच निर्धारित वाढीव मुदतीत कामे पूर्ण होणार आहेत.
शून्य ते २५ टक्के काम झालेल्या योजना ः पडळी, नरतवडे. २५ ते ५० टक्के काम झालेल्या योजना ः गुडाळ, राधानगरी, चंद्रे, बनाचीवाडी.
५० ते ७५ टक्के काम झालेल्या योजना ः धामोड, खिंडी व्हरवडे, पाल खुर्द, कुडुत्री, मल्लेवाडी, शिरगाव, आमजाई व्हरवडे, म्हासुर्ली, ठिकपुर्ली, मौजे कासारवाडा, कौलव, पनोरी, दुर्गमानवाड, आडोली, सावर्दे, फेजिवडे, पिरळ, गवशी, राशिवडे बुद्रुक, कोते.
यातील काही योजनांच्या कामात संबंधित ठेकेदाराकडूनही दिरंगाई झाल्याचेही निदर्शनास आले आहे. एकूणच जलजीवन योजनांच्या कामाचे पूर्णत्व
यंत्रणेच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरले आहे.
...
कोट....
गेल्या आर्थिक वर्षापासून जलजीवन अभियानांतर्गत काम सुरू असलेल्या योजनांसाठी निधी कमतरता झाली आहे. आर्थिक आणि तांत्रिक कारणाने बहुतांशी योजनांची कामे रखडत सुरू राहिली. ही स्थिती वेळीच दूर झाली असती तर किमान ८० टक्के योजनांची कामे पूर्ण झाली असती. या आधी योजनांची कामे पूर्ण करण्यास दिलेल्या निर्धारित मुदतीत वाढ केली आहे. वाढीव मुदतीत अपूर्णावस्थेतील योजनांची कामे पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न राहील.
- आर. व्ही. महाजन,
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग राधानगरी
...........

चौकट....
काम पूर्ण झालेल्या योजना
चक्रेश्वरवाडी, मजरे कासारवाडा, राजापूर, रामणवाडी, चाफोडी तर्फे तारळे, येळवडे, पुंगाव, सोळांकूर, वलवण, मालवे, कंथेवाडी, घुडेवाडी, पंडेवाडी, बारडवाडी, आणाजे, आपटाळ, राशिवडे खुर्द, मोघर्डे, घोटवडे, पालकरवाडी, माजगाव, बरगेवाडी, मांगेवाडी.
.....
चौकट...
पूर्णत्वाच्या टप्प्यातील योजना
आटेगाव, पडसाळी, सोन्याची शिरोली, मांगोली, कारीवडे, सुळंबी, वाघवडे, केळोशी खुर्द, मुसळवाडी, मानबेट, कुंभारवाडी, कपिलेश्वर, ऐनी, हेळेवाडी, न्यू करंजे, पिंपळवाडी, अर्जुनवाडा, करंजफेण, तिटवे, कासारपुतळे, आकनूर, तुरंबे, तारळे खुर्द, सरवडे, चांदेकरवाडी, चाफोडी तर्फे ऐनघोल, फराळे, आवळी बुद्रुक, तळाशी, सिरसे, धामणवाडी, केळोशी बुद्रुक, हसणे, खामकरवाडी, तळगाव, पाटपन्हाळा, सावर्डे पाटणकर, कोदवडे, तरसंबळे, मोहडे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com