रस्ता निवेदन

रस्ता निवेदन

Published on

05807
शाळेच्या वेळेत बस सोडा
राधानगरी-दाजीपूर मार्गातील गावांतून मागणी

सकाळ वृत्तसेवा

राधानगरी, ता. २४५ : राधानगरी ते दाजीपूर रस्त्याच्या दुरूस्ती व नूतनीकरणासाठी ४५ दिवस बंद करण्यात आला आहे. यादरम्यानच्या गावांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मार्गांवरील एसटी बस सेवा शालेय वेळेत पूर्ववत करावी; अन्यथा दोन दिवसांत आंदोलनाचा इशारा हसणे परिसरातील गावाच्या ग्रामस्थानी दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी दाजीपूर, फोंडा किंवा राधानगरी येथे जावे लागते. एस.टी. बस सेवा शालेय वेळेत सुरू ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने आणि परिवहन विभागाने समन्वय साधून, रस्त्याच्या कामामुळे होणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून बस सेवेचे वेळापत्रक आणि मार्ग नियोजन करावे. रुग्ण वाहतूक: गर्भवती माता, डायलेसिस रुग्ण, तसेच इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींसाठी रुग्णालयात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, तेथे पर्यायी रस्ते उपलब्ध नसल्यास प्रशासनाने तात्पुरत्या मार्गांची व्यवस्था करावी.
वाहन वाहतूक, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, तसेच घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकामांसाठी साहित्य वाहतुकीसाठी स्थानिक प्रशासन, वाहतूक विभाग आणि संबंधित प्राधिकरणांनी एकत्र येऊन नागरिकांच्या गरजांचा विचार करून रस्त्याच्या कामादरम्यान वाहतूक व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी सभापती मोहन पाटील, माजी सरपंच सूर्यकांत सावंत, ओलवणचे माजी सरपंच सुभाष पाटील, राजू तांबे, सुरेश पाटील, सतीश नरसाळे, शेखर पाटील, विश्वनाथ पाटील, यशवंत कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com