

राशिवडे शाळेत योग शिक्षणाची प्रात्यक्षिके
राशिवडे बुद्रुक : येथील कन्या विद्यामंदिरात योग शिक्षणाची प्रात्यक्षिके झाली. योग अभ्यासक राजाराम गंगाराम डवरी यांनी शालेय मुलींमध्ये योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता कशी वाढते याविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत डवरी यांनी ‘सीट अँड रिच’ या तत्त्वावर आधारित उपकरण तयार करून विद्यार्थिनींसमोर प्रात्यक्षिक सादर केले. गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेतील विद्यार्थिनींनी नियमित योगाचे धडे घेतले असून, त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शारीरिक लवचिकतेवर दिसून येत आहे. कार्यक्रमासाठी सोनल घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, योग शिक्षिका प्रा. श्वेतलीना पाटील, प्रा उज्ज्वला डफळे, प्रा. अर्चना घाटगे, प्रा. सिद्धी बकरे, प्रा. रोहित गवळी, योग शिक्षिका वंदना डवरी, मुख्याध्यापक एस. के. जाधव व अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभले.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.