
सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असून, तेथे सीमावासीयांना न्याय मिळेल, या अनुषंगाने वक्तव्य करून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असा आशावाद मांडला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
बेळगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र संदर्भात केलेले वक्तव्य कर्नाटक नेत्यांसह कन्नड संघटनांना चांगलेच झोंबले आहे. महाराष्ट्र सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार सीमाप्रश्न विनाकारण उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे त्यांच्या या व्यक्तव्याचा निषेध करतो, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी म्हटले आहे. तसेच महाजन अहवालच अंतिम आहे, हे पूर्ण जगाला माहिती आहे, असेही येडियुराप्पा यांनी सांगितले.
हेही वाचा - नेत्यांनी सत्तेसाठी लाज विकली, हिंदुत्व विकले, मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले ? -
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी आदरांजली वाहताना त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. विविध स्मृतींना उजाळा देताना पवार म्हणाले, 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मनात नेहमीच स्थान मिळविले. मराठी भाषिकांची शान आणि अस्मिता वाढावी, यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहिले. जनतेचे प्रश्न, हक्कासाठी लढा उभारून न्याय देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्याची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्त पाहिले. ते स्वप्न सर्वजण मिळून पूर्ण करुया'. उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी विरोध दर्शविण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीही पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांचा निषेध नोंदविला आहे. पवार यांनी उध्दटपणे व्यक्तव्य केले आहे. सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम असल्याचे जगाला माहित आहे, असे तुणतुणे वाजविले.
हेही वाचा - सक्तीची बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना दिलासा ; पुढील महिन्यात बदली प्रक्रियेवेळी मिळणार प्राधान्य -
दरम्यान, या वक्तव्याचा समाचार मराठी भाषिकांनी सोशल मिडियावर घेण्यास सुरु केली आहे. पवार यांनी योग्य भुमिका मांडली आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असून, तेथे सीमावासीयांना न्याय मिळेल, या अनुषंगाने वक्तव्य करून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल, असा आशावाद मांडला आहे. त्यात काही गैर नाही, अशा शब्दामध्ये फेसबुक, ट्विटरवर कर्नाटकाचा समाचार घेण्यात येत आहे.
संपादन - स्नेहल कदम