कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन

सकल मराठा समाजातर्फे ताराराणी चौक येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन
Updated on

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे ताराराणी चौक (tararani chauk, kolhpaur) येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हातात भगवे ध्वज व डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करुन मराठा बांधवांनी रास्ता रोको करत सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. (kolhapur distrcit) आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पोलिस प्रशासनाने रास्ता रोको आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता सकल मराठा समाजाचे बांधव ताराराणी चौकात जमा झाले. ताराराणींच्या पुतळ्याभोवती उभा राहून घोषणाबाजीस सुरवात केली.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन
शाब्बास! इंजिनिअरने दगड फोडून माळावर फुलवली बांबूशेती

सर्व आजी माजी आमदार खासदारांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे, मराठाद्वेषी मागासवर्गीय आयोग रद्द करा, सारथी संस्थेला एक हजार कोटी मिळालेच पाहिजे, एमपीसीच्या २०१४ पासून रखडलेली सर्व नियुक्तीपत्रे त्वरित देण्यात यावी, पंजाबराव देशमुख मराठा हॉस्टेल प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे, मराठ्यांच्या स्वाभिमानाला दिवस नतदृष्ट समाजकंटकांचा धिक्कार असो, या आशयाचे फलक त्यांच्या हातात होते. मराठा महिला भगिनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाल्या. पोलिस बंदोस्तात सुमारे एक तास आंदोलन झाले. उड्डाणपूल, मध्यवर्ती बस स्थानक, धैर्यप्रसाद हाॅल व तावडे हाॅटेलमार्गे येणाऱ्या वाहनांची पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली.

आंदोलनात शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. जयंत पाटील, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, महेश जाधव, सुजित चव्हाण, बाबा पार्टे, सचिन तोडकर, जयेश कदम, दिलीप पाटील, निवास साळोखे, भगवान काटे, विजयसिंह खाडे-पाटील, हरी पाटील, प्रथमेश मेढे, अमृता भोसले, शहाजी भोसले, शशिकांत मोहिते, अरविंद शर्मा, विजय कुरणे, सचिन पवार, सुधीर आजगेकर, राहुल शिंदे, विजय शिंदे, सत्यजित कदम, सुनील कदम, लाला गायकवाड, संदीप सावंत, कुलदीप गायकवाड, अशोक देसाई, सुरेश जरग, संदीप देसाई, जयकुमार शिंदे, स्वप्नील पार्टे, संदीप घाटगे, प्रकाश घाटगे, मोहन साळोखे, राजसिंह शेळके, धनश्री तोडकर, रुपाराणी निकम, कल्पना बडकस, पूजा शिंदे, मीनाक्षी सुतार, संपदा मुळेकर, नीता पडळकर सहभागी झाले होते.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन
चिपळूणात 225 पेक्षा जास्त पक्ष्यांचे वास्तव्य; अभ्यासकांसाठी पर्वणी

आंदोलनात रिधीमा इंदूलकर बाल शिवाजी महाराज, तर याज्ञी भोसले बाल जिजाऊच्या वेशभूषेत सहभागी झाली. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहीर मिलिंद सावंत यांनी भगव्या सायकलसह सहभाग घेत शाहिरी सादर करत वातावरणात रंग भरला. आंदोलनाचा पुढील निरोप देण्यासाठी दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. त्यानंतर मराठा बांधवांना त्याची माहिती सांगितली जाईल, असे समन्वयकांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com